हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील चिंचोरडी येथील घटनेत ओढ्याच्या पुरात वाहून गेलेल्या संध्याचा मृतदेह सतरा तासानंतर ओढ्यात असलेल्या झाडाझुडपात आढळला. गोता खोर समशेर खान पठाण यांनी हा मृतदेह शोधला. त्यांना संध्याचा मृतदेह डोळ्यात जीव ओतून शेवटचं पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
घटनास्थळी प्रभारी तहसीलदार श्रीराम पाचपुते, पोनी सुनील निकाळजे, मंडळ अधिकारी एन . डी. नाईक, तलाठी बी. एस. जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी एकच धाव घेतली. शनिवारी सायंकाळी चार वाजता नातेवाईक व काही ग्रामस्थ संध्याला डोळ्याने भरून पाहण्यासाठी ताटकळत बसले होते. ओढ्याला आलेला पूर आणि अंधारामुळे शोध कार्य थांबवावे लागले.
पहाटेपासून सुरू केले शोधकार्य
संध्या ओढ्यात वाहून गेली, तेव्हापासून शोधकार्य सुरू होते. बाराकाईने शोधमोहीम केल्यावर झाडा झुडपात त्यांचा मृतदेह सापडला. गोता खोर समशेर खान पठाण 'बेटी मिल गई' असे सांगत मृतदेह आणला.
मृतदेह शोधण्यासाठी ग्रामस्थांचे परिश्रम