महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 4, 2020, 1:04 PM IST

ETV Bharat / state

धुक्यात हरवली हिंगोली, पिकांचे नुकसान

हिंगोली जिल्ह्यातील गावे, रस्ते आणि शहर धुक्यात हरवून गेले आहे. सतत पडणारे धुके हे रब्बी पिकांसाठी धोकादायक आहे.

धुक्यात हरवली हिंगोली
धुक्यात हरवली हिंगोली

हिंगोली- जिल्ह्यात तीन दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढली असून सर्वत्र धुक्याची चादर पसरत आहे. या धुक्यात गाव, रस्ते आणि शहर हरवून गेले आहे. धुक्यामुळे वाहन चालकांना सावधानता बाळगावी लागत आहे. मात्र, सतत पडणारे धुके हे रब्बी पिकांसाठी धोकादायक आहे.

धुक्यात हरवली हिंगोली

हेही वाचा - थंडी वाढताच नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात भरला पक्ष्यांचा मेळा, पक्षीप्रेमींसाठी पर्वणी
हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने, शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त होत आहे. फळवर्गीय पिके आणि भाजीपाल्याला देखील धुक्यामुळे मर रोगाची लागण होत असल्याने भाजीपाला उत्पादक हैराण झाले आहेत. वातावरणातील पारा हा 15 अंश सेल्सिअस वर आला आहे. शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा नागरिक प्रयत्न करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details