हिंगोली - जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी देखील सेनगाव, हिंगोली तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मात्र, सततच्या या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. काही ठिकाणी उगवून आलेली पिके पाण्याणे दबली गेली आहेत. तर काही ठिकाणी पेरलेले बियाणे वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
जिल्ह्यात सलग तीन ते चार दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेले नसल्याने दुबार नव्हे तर तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. नियमित सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे फार मोठे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्यामुळे उगवणीला सुरुवात झालेले पीक सडायला सुरुवात झाली आहे. त्यातच दुबार पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याच्या हातात पैसा नाही त्यामुळे शेतकरी यंदा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल - हिंगोलीत मुसळधार पावसाची हजेरी
शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेले नसल्याने दुबार नव्हे तर तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. नियमित सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे फार मोठे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्यामुळे उगवणीला सुरुवात झालेले पीक सडायला सुरुवात झाली आहे. त्यातच दुबार पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याच्या हातात पैसा नाही त्यामुळे शेतकरी यंदा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.
हिंगोली सेनगाव तालुक्यात शनिवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही ठिकाणी महामार्ग जलमय झाले होते. परिणामी काही काळापर्यंत वाहनधारकांना पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागली. तर या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. गेल्या 24 तासात 58. 37 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्हाभरात सरासरी 11. 67 मी. मी पाऊस झाला आहे. आद्यापर्यंत 242. 89 मी मी प्रशासनाकडे पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या अखेर 28. 26 एवढी नोंद झाली आहे.