हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील कुंडलवाडी येथे प्रेमीयुगुलाने गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतशिवारात एकाच दोरीने गळफास लावून जीवन यात्रा संपविण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अजय केशव डुकरे (16) आणि सरस्वती कऱ्हाळे (18) अशी या प्रेमीयुगुलांची नावे आहेत.
काय आहे प्रकरण ...
सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. अजय डुकरे यांच्या शेतात हळदीची काढणी सुरू आहे. त्यामुळे तो शेतामध्ये हळदीची राखण करण्यासाठी जातो असे म्हणून घराबाहेर पडला होता. तो नेहमीप्रमाणे जेवण करून गुरुवारी रात्री दहा वाजता शेतामध्ये गेला होता. मात्र, सकाळी तो बराच वेळ होऊन देखील घरी परतला नव्हता. गावातील काही व्यक्तींनी शेताकडे मुलगा आणि मुलगी यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये पाहिला. अधिक माहिती घेतली असता,तो अजय आणि सरस्वती या दोघांचा मृतदेह असल्याचे दिसून आले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच बाळापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत हुडेकर, जमादार भगवान वडकीले हे पथकासह दाखल झाले. या तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.
अजय परभणी येथील सैनिकी शाळेचा विद्यार्थी....