हिंगोली - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. हा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. अशाच परिस्थितीत हिंगोलीतल्या कनेरगाव नाका येथे परजिल्ह्यातून आलेला एक व्यक्ती होम क्वारंटाईन न राहता ती व्यक्ती घरातून गायब आहे. ग्रामस्तरावरील पथके अनेकदा रिकाम्या हाताने परतत आहेत. तर दुसरीकडे मात्र तालुका आरोग्य अधिकारी रुग्ण शोधण्यासाठी यंत्रणा हलवताना दिसत नाहीत.
संपूर्ण देशामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. हा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहेत. घरोघरी जाऊन बाहेर गावाहून आलेल्याची नोंदणी करून घेतली जात आहे. मात्र, कनेरगाव नाका येथे मागील काही दिवसांपासून एक जण मुंबई येथून आलेला एक व्यक्ती परिसरात मुक्त फिरत आहे. वास्तविक पाहता पर जिल्ह्यातून आलेली कोणतीही व्यक्ती घरातच राहणे गरजेचे आहे. मात्र, संबंधीत व्यक्ती हा घरातून गायब राहत आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी रात्री अपरात्री कोरोना जनजागृती पथक घरी जात आहे. तर त्या व्यक्तीचे कुटुंब पथकाला धमकी देत आहे. त्यामुळे पथक रिकाम्या हाताने परतत आहे.
होम क्वारंटाईनमधून संशयिताचे पलायन; शोध पथकांची मात्र दमछाक - होम क्वारंटाईन हिंगोली
कनेरगाव नाका येथे मागील काही दिवसांपासून एक जण मुंबई येथून आलेला एक व्यक्ती परिसरात मुक्त फिरत आहे. वास्तविक पाहता पर जिल्ह्यातून आलेली कोणतीही व्यक्ती घरातच राहणे गरजेचे आहे. मात्र, संबंधित व्यक्ती हा घरातून गायब राहत आहे.
होम क्वारंटाईनमधून संशयिताचे पलायन; शोध पथकांची मात्र दमछाक
खुद्द सरपंच आणि ग्रामसेवक देखील त्या व्यक्तीच्या घरी गेले. मात्र, घरी कोणीही मिळून आलेले नाही. त्यातच तालुक्याची मुख्य जबाबदारी असलेले तालुका आरोग्यधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांच्यावर काही लोक नाराज आहेत.