हिंगोली -राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे आजपासून उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीर सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात येत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील १२ ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिरही भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनीदेखील दर्शन घेतले. मात्र, या मंदिरात पहिल्याच दिवशी आमदारांनी स्वतः राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांना तिलांजली दिल्याचे दिसून आले. सुरक्षित अंतराचा फज्जा उडवला गेला. तसेच आमदारांसह सर्वजण विनामास्क मंदिरात प्रवेश घेत होते. त्यामुळे सत्ताधारी आमदारच विनामास्क दर्शन घेत असतील तर इतरांचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
पहिल्याच दिवशी सत्ताधारी आमदारांकडून नियमाचा भंग -
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मंदिरातील संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. मंदिर उघडण्यापूर्वी मंदिरात भाविकांना प्रवेश देण्यासाठी नियमदेखील घालून देण्यात आलेले आहेत. मात्र, पहिल्याच दिवशी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे आपल्या कार्यकर्त्यांसह मंदिरांमध्ये नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी गेले असता नियमांचा भंग केला. त्यांच्यासह सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्याही तोंडाला मास्क नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सोशल डिस्टंसिंगचे पालन होण्यासाठी मंदिर प्रशासनाचे प्रयत्न -