हिंगोली -जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली आहे. या दरम्यान फक्त जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला आणि किराणा सामान खरेदीसाठी प्रशासनाने एक दिवसाआड वेळापत्रक निश्चित केले होते. मात्र, याचा अनेकजण गैर फायदा घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नवीन आदेश देत तीन दिवस सर्वच मार्केट बंद केले आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्याची वाहने जप्त केली जाणार आहेत.
एक दिवसाआड नव्हे तीन दिवस सर्वच बाजार पेठ राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - हिंगोली लॉकडाऊन
संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय आपत्कालीन सेवेसाठी चार चाकी, दुचाकी वाहनांना परवानगी दिली होती. मात्र, वैद्यकीय आपत्कालीन सेवेच्या नावाखाली अनेक जण रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नव्याने आदेश काढून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर बंदी घातली आहे.
कोरोनाची लागण झालेला एक रुग्ण हिंगोलीत आढळला आहे. त्यामुळे प्रशासन आणखी गतीने कामाला लागले आहे. संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय आपत्कालीन सेवेसाठी चार चाकी, दुचाकी वाहनांना परवानगी दिली होती. मात्र, वैद्यकीय आपत्कालीन सेवेच्या नावाखाली अनेक जण रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नव्याने आदेश काढून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर बंदी घातली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी वैद्यकीय कारणास्तव परवानगी घेतली वाहने, अत्यावश्यक सेवा पुरवठा करण्यासाठी परवाना असलेली वाहने, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी (कार्यालयीन ओळखपत्र असलेली) यांची वाहने सोडून इतर सर्व वाहनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.