महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गावबंदी संविधानाच्या विरुद्ध, असे बोर्ड लावणाऱ्यांना शिक्षा करा; हिंगोलीमध्ये छगन भुजबळ गरजले - हिंगोली ओबीसी मेळावा

Chhagan Bhujbal : आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. मात्र, त्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नका. त्यांना वेगळं आरक्षण द्या, असा पुनरुच्चार ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी केलाय. रविवारी (26 नोव्हेंबर) हिंगोतील ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला अनेक ओबीसी नेते हजर होते.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 3:05 PM IST

Updated : Nov 26, 2023, 5:16 PM IST

हिंगोली Chhagan Bhujbal : हिंगोली येथे रविवारी (२६ नोव्हेंबर) ओबीसी समाजाचा दुसरा मेळावा (OBC Melava Hingoli) झाला. मराठा समाजाला ओबीसी (Chhagan Bhujbal OBC Melava Hingoli) समाजातून आरक्षण देण्यास ओबीसी नेते विरोध करत आहेत. छगन भुजबळ यामध्ये आघाडीवर आहेत. यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद रंगलाय.

बीडमध्ये आम्ही जाळपोळ केली नाही : "बीडमध्ये आम्ही जाळपोळ केली नाही. वेगवेगळ्या समाजानं बीडमध्ये जाळपोळ केली. आमदार क्षीरसागर यांचं यातून कुटुंब कसंतरी वाचलं. मुसलमान समाजानं त्यांना वाचवलं. शिवरायांच्या महाराष्ट्रात आया बहिणींना अशाप्रकारची वागणूक मिळते आहे. बीडमध्ये एवढी जाळपोळ झाली, मात्र कोणी निषेध केला नाही. कोणी धीर दिला नाही", असं भुजबळ म्हणाले.

गावबंदी संविधानाच्या विरुद्ध : मराठा नेत्यांनी केलेल्या गावबंदीबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, "गावबंदी संविधानाच्या विरुद्ध आहे. संविधान मधलं कलम १९ सांगतं की कोणाला बंदी करता येत नाही. जर कोणी गावबंदी केली तर त्यासाठी एक महिन्याच्या शिक्षेचं प्रावधान आहे. सरकार हे करणार का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना त्यांनी, "हे गावबंदीचे बोर्ड काढा आणि ज्यांनी बोर्ड लावले त्यांना एका महिन्याच्या शिक्षेवर पाठवा", असं आवाहन केलं.

बबनराव तायवाडे यांची टीका : यावेळी बोलताना ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मराठा नेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. आम्ही संविधानानं दिलेल्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी संघर्ष करतोय, असं ते म्हणाले. आतापर्यंत ६ अहवाल प्रसिद्ध झाले, मात्र तरीही मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध झालं नाही. मंडल आयोगाच्या अहवालामध्ये मराठा समाजाला 'सुपर फॉरवर्ड कास्ट' म्हटलंय. ओबीसींनी तुमचं काय चोरलं हे मराठा नेत्यांनी सांगावं. आमच्यावर खोटे आरोप लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही, असा घणाघात त्यांनी केला.

ताफा अडवला : या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ नांदेडहून कारनं हिंगोलीला रवाना झाले. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरजवळ मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. यावेळी त्यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केल्याची माहिती आहे.

पहिल्या सभेत आक्रमक भाषण : छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. यामुळे मराठा समाज भुजबळांवर नाराज आहे. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसींची पहिली सभा झाली होती. या सभेत भुजबळांनी अत्यंत आक्रमक भाषण केलं होतं. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळांचा विरोध केला आहे.

हेही वाचा :

  1. मराठा समाज भुजबळांवर नाराज, विधानसभेत फटका बसेल का?
Last Updated : Nov 26, 2023, 5:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details