हिंगोली- जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने लावलेल्या हजेरीमुळे वसमत तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये विजेचे पोल वाकले आहेत. तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटून शेतामध्ये पडल्या आहेत. त्यामुळे विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने एका बैलाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शनिवारीच एका बैलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे सलग दोन दिवसांत दोन बैलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
तुटलेल्या विजेच्या तारेने घेतला बैलाचा बळी, 2 दिवसातील दुसरी घटना
विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने एका बैलाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शनिवारीच एका बैलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
तुटलेल्या विजेच्या तारेने घेतला बैलाचा बळी
जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे विजेच्या तारा तुटून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तर विद्युत वितरण कंपनीकडून तुटलेल्या तारा न जोडता त्यामधील विद्युत प्रवाह सुरूच ठेवला जात आहे. त्यामुळे वसमत तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी जमिनीवर पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने बैलाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी इंजनगाव येथील शेतकरी फकीर मंईग यांच्या बैलाचा जमिनीवर तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने बैलाचा मृत्यू झाला होता.