हिंगोली - मागील तीन ते चार दिवसापासून जिल्ह्यामध्ये अधून-मधून पाऊस हजेरी लावत आहे. आज पहाटे दोन वाजेपासून ओंढा नागनाथ तालुक्यातील विविध भागात पावसाने हजेरी ( Rain lashed various parts of Aundha Nagnath taluka ) लावली. याच परिस्थितीमध्ये वसमत तालुक्यातील चोंढी शहापूर ( Chondi Kathoda village ) जवळ असलेला पूल कोसळल्याची घटना ( bridge collapsed ) शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. घटनेची माहिती नागरिकांना कळताच नागरिकांनी रस्त्यावर झडांच्या फांद्यां टाकून वाहतुक बंद केली. त्यामुळे औरंगाबाद वरून जिंतूर ओंढा मार्गे नांदेड, आंध्र प्रदेशात जाणारी वाहतुक वळवण्यात अली आहे.
पुल गेला वाहून -चोंडढी शहापूर येथे मागील अनेक दिवसांपासून पूल मोडकळीस आला होता, शिवाय पुलाला अनेक ठिकाणी तडे देखील गेले होते, आज पहाटे झालेल्या पावसामुळे पालखालून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला अन पुलच पूर्णपणे वाहून गेला. हा विदारक प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या मार्गाने येणारी वाहतूक थांबवून घेतली.