हिंगोली - गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातल्या राजकारणाला नाट्यमय वळण मिळाले आहे. मोठ्या राजकीय घडामोडीनंतर पुन्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात शपथ घेतली आहे. त्यामुळे हिंगोली येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
'मी पुन्हा येईन' म्हणत हिंगोलीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष हेही वाचा -सत्ता समीकरण बदलले, अजित पवारांचे बंड की शरद पवारांचा गेम?
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडी सुरू होत्या. एवढेच नव्हे तर रोजच्या घडामोडींवरून कोणाची सत्ता येईल स्पष्ट सांगता येत नव्हते. शिवसेना जोर देत असल्यानेच महाराष्ट्रातील सत्तेचे शिवधनुष्य हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पेलतील हेच स्पष्ट संकेत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील उद्धव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यामुळे तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट होते. मात्र, शनिवारी राजभवनावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात भुकंप झाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा -ते पुन्हा आले ! देवेंद्र फडणवीसांचे ट्विटर स्टेटस बदलले
देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हिंगोली येथे भाजप कार्यकर्त्यांनी फडवणीसांचे तैल चित्र हातात घेत, फटाके फोडून जल्लोष साजरा केला. 'मी पुन्हा येईन' 'मी पुन्हा येईन' अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.