महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bus Accident In Hingoli : दुचाकी आणि बसची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार ; जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच - मारोती खोबराजी जुमडे

दुचाकी आणि बसच्या धडकेत (Bus Accident In Hingoli) दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना औंढा नागनाथ तालुक्यातील जांभरुण आंध येथे घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी थेट बसमध्ये जाऊन पुढच्या चाकात (Bike rider died on spot) अडकली.

Bus Accident In Hingoli
बसचा भीषण अपघात

By

Published : Dec 3, 2022, 10:14 AM IST

हिंगोली :जिल्ह्यामध्ये अपघाताची मालिकाही सुरूच (Bus Accident In Hingoli) आहे. काल दुचाकी आणि बसच्या धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना औंढा नागनाथ तालुक्यातील जांभरुण आंध येथे घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी थेट बसमध्ये जाऊन पुढच्या चाकात अडकली. सर्वत्र रक्तच रक्त सांडल्याचे दिसून (Bike rider died on spot) आले.


दुचाकी आणि बसचा अपघात :मारोती खोबराजी जुमडे (रा. जांभरुण आंध) असे मयताचे नाव आहे. मारुती आणि त्याचा मित्र सुरज प्रकाश जुमडे हे दोघे दुचाकीवरून भोसी येथे मासेमारी करण्यासाठी जात होते. दरम्यान भोसी येथे त्यांच्या दुचाकीचा आणि बसचा समोरासमोर अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की, दुचाकी थेट बसच्या पुढील दोन्ही चाकामधोमध अडकून पडली. मारोती जुमडे यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुरज जुमडे हे गंभीर जखमी (Bike rider died on spot in bus accident) आहेत.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया :घटनेची माहिती मिळताच आवडा नागनाथ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडगे, जमादार बापूराव चव्हाण त्यांच्या पथकाने घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली. जखमी सूरजला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात हलविले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू (accident in Hingoli) होती.

ABOUT THE AUTHOR

...view details