श्रीराम नवमीनिमित्त हिंगोलीत भव्य दुचाकी रॅली - rally
दरवर्षीच श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्यदिव्य रॅलीचे आयोजन केले जाते. याहीवर्षी रॅलीमध्ये अनेक नागरिक सहभागी झाले होते. वाढत्या तापमानातही नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता.
श्रीराम नवमीनिमित्त हिंगोलीत भव्य दुचाकी रॅली
हिंगोली - शहरात श्रीराम नवमीनिमित्त जागोजागी भगवे झेंडे आणि भगवे पताके लावल्यामुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे. राम जन्मोत्सवानिमित्त शहरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली होती. यात मोठ्या संख्येने दुचाकीस्वार सहभागी झाले होते. या रॅलीत चिमुकल्यांनी सादर केलेला राम-लक्ष्ममाचा सजीव देखावा आकर्षणीय ठरला.