हिंगोली - राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामराव वडकुते यांनी आज मुंबईत मुख्यंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. वडकुते यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला हिंगोलीत मोठ्ठा धक्का बसला आहे. मागील काही दिवसांपासून वडकुते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती. अखेर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का..! दिग्गज नेते रामराव वडकुतेंनी केला भाजपमध्ये प्रवेश - विधानसभा निवडणूक
रामराव वडकुते हे शेळी-मेंढी महामंडळाचे दोन वेळा अध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच ते हिंगोली जिह्यात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मानले जातात. मात्र, त्यांनाही भाजपचा मोह आवरला नाही. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांनी भाजप प्रवेशाविषयी चर्चा केली होती. त्यावर पाटील यांनी मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन वडकुतेनां भाजपच्या गोटात घेतले.
रामराव वडकुते हे शेळी-मेंढी महामंडळाचे दोन वेळा अध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच ते हिंगोली जिह्यात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मानले जातात. मात्र, त्यांनाही भाजपचा मोह आवरला नाही. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांनी भाजप प्रवेशाविषयी चर्चा केली होती. त्यावर पाटील यांनी मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन वडकुतेनां भाजप गोटात घेतले.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात धनगर समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे. वडकुते याच समाजाचे प्रतिनिधी असल्याने त्यांना भाजप प्रवेश देण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. वडकुतेनीं जरी भाजमध्ये प्रवेश केला असला तरी, धनगर समाजाचे नेते महादेव जानकर मात्र भाजपवर नाराज आहेत. दरम्यान, वडकुते यांच्या भाजप प्रवेशामुळे हिंगोली जिह्यात राष्ट्रावादीला मोठा धक्का बसला आहे.