महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधान सभेच्या तोंडावर नेते लागले कामाला; मतदारांसाठी योजनांची आठवण

हिंगोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिकडे-तिकडे प्रचाराच्या गाड्या फिरत असल्याचे रस्त्यावर पाहावयास मिळत आहे. तर मतदारही या गाड्यांचा चांगला अनुभव घेत लाऊडस्पीकरद्वारे दिली जात असलेली योजनांची माहितीही एकाग्रतेने ऐकत  आहेत.

By

Published : Aug 28, 2019, 7:54 AM IST

Updated : Aug 28, 2019, 8:16 AM IST

हिंगोली जिल्ह्यात प्रचाराच्या गाड्या फिरत आहेत.

हिंगोली - विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार निवडणुकीच्या तोंडावर गतीने कामाला लागले आहेत. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात आपले प्रचाराचे वाहन कसे जाईल, यासाठी नेते कसोशीने प्रयत्न करत आहेत. एवढेच नव्हे तर विविध शासकीय योजनांची यादी ही प्रचार रथावर लावून, योजनेचे फायदेही लाऊडस्पीकरद्वारे सांगितले जात आहेत. आकर्षक गीत वाजवूनही मतदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

हिंगोली जिल्ह्यात प्रचाराच्या गाड्या फिरताना

हिंगोली, कळमनुरी आणि वसमत मतदारसंघातील विविध पक्षाचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. तसेच कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे सुरू आहे. कार्यकर्त्यांना मतदारांची गैरसोय दूर करण्यासाठी समजावून सांगितले जात आहेत, तर सामूहिक कार्यक्रम घेतले जात आहेत. तर गुडघ्याला बांशीग बांधून असलेले काही इच्छुकांकडून 'तुम्हारे खत मे हमारा सलाम' असेच काहीसे प्रयत्न सुरू आहेत.

काही नेते तर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एवढे सक्रिय झाले आहेत की आपले प्रचाराचे वाहन पोहोचण्या अगोदर त्या गावातील मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी पोहोचत असल्याचे अनेकदा पहावयास मिळाले. विशेष म्हणजे सध्याच्या स्थितीत तर विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते आप आपल्या मतदारसंघातील एकही कार्यक्रम टाळण्याचे धाडस करत नाहीत. लहान कार्यक्रमातही स्वतः नाही तर कार्यकर्त्यांना आवर्जून पाठविले जात आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्रीसाहेब कृत्रिम पावसाची गरज हिंगोलीतही, शेतकऱ्यांची आर्त हाक

विशेष करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आला तर त्यामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक जण हजेरी लावत आहेत. शक्य न झाल्यास कार्यकर्त्यांना पाठविले जात आहे. मग तो कार्यकर्ता आवर्जून आपल्या त्या नेत्यांचे नाव सांगून आमचा ही पाठिंबा असल्याचे सांगत आहे. असे एक ना अनेक कार्यक्रमात हीच परिस्थिती आहे.जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीत जिकडे-तिकडे प्रचाराच्या गाड्या फिरत असल्याचे रस्त्यावर पाहावयास मिळत आहे. तर मतदारही या गाड्यांचा चांगला अनुभव घेत लाऊडस्पीकरद्वारे दिली जात असलेली योजनांची माहितीही एकाग्रतेने ऐकत आहेत. तर बरेच जण प्रचार वाहनवरील योजनांची माहिती वाचत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत विधानसभा निवडणुकीमुळे तरी मतदारांना विविध पक्षाचे नेते असल्याचा अन् सरकारच्या योजनांची माहिती मिळण्यास मदत होत आहे.

हेही वाचा- हिंगोली: हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेला मारल्याचा आरोप; आई-वडिलांसह ग्रामस्थांचे उपोषण

Last Updated : Aug 28, 2019, 8:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details