महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आम्ही हरलो म्हणजे थांबलो नाही; आता तेवढ्याच जोमाने विधानसभेच्या तयारीस लागलोय - एमआयएम - Firoz Lala

एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात ४१ लाख मतदान मिळाले. त्यामुळे आम्ही जरी लोकसभेमध्ये पराभूत झालो असलो तरीही आम्ही अजिबात हरलो नाही. आता विधानसभेच्या तयारीला तेवढ्याच मोठ्या जोमाने लागलो असल्याचे एमआएमचे निरीक्षक फिरोज लाला यांनी सांगितले.

एमआएमचे निरीक्षक फिरोज लाला

By

Published : Jun 11, 2019, 10:04 PM IST


हिंगोली - एमआयएममध्ये कोणतेही मतभेद नसून आगामी विधानसभेच्या निवडणूकीसाठी वंचित आघाडी पुन्हा सज्ज होत असल्याचे एमआएमचे निरीक्षक फिरोज लाला यांनी सांगितले.

एमआएमचे निरीक्षक फिरोज लाला

आम्हाला लोकसभेत महाराष्ट्रातील मतदारांनी 41 लाख मतदान करून भरभरून सहकार्य केले. यावरूनच स्पष्ट होतेय की मतदारांचा आमच्या वरचा विश्वास कायम आहे. त्यामुळे आम्ही जरी लोकसभेमध्ये पराभूत झालो असलो तरीही आम्ही अजिबात हरलो नाही. आता विधानसभेच्या तयारीला तेवढ्याच मोठ्या जोमाने लागलो तेही वंचित सोबतच. एमआएमचे निरीक्षक फिरोज लाला यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात वंचित आणि एमआयएमच्या उमेदवारास मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. एवढेच काय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला तब्बल 41 लाख मतदान झाले. त्यामुळे आम्हाला ही जनता अजिबात वाऱ्यावर सोडणार नाही, असा ठाम विश्वास आहे. जरी लोकसभा आमच्या हातातून गेली तरीही विधानसभा आम्ही जाऊ देणार नाही, त्यासाठी आम्ही पूर्वतयारीला लागलो आहोत. आम्ही जनतेचे सर्वच प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या हितासाठी कोणतेही निर्णय घेण्याची ची आमची तयारी आहे. हिंगोली जिल्ह्याचा मुख्य प्रश्न म्हणजे सिंचन आहे, त्याच बरोबर शैक्षणिकसह शेतीमाल प्रकिया उद्योग कसा उभारता येईल याकडे लक्ष घालणार आहोत. तसेच लोकसभेमध्ये पराभूत होण्याची कारणे ही आम्ही जिल्ह्यात एमआयएम व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही चूक विधानसभेमध्ये होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत.

आम्ही एमआयएम एम आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनतेसमोर जाणार आहोत. जनतेचे प्रश्न जाणून घेणार आहोत. ते सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता आम्हाला संघटन मजबूत करावे लागणार आहे आणि ते करत आहोत. निश्चितच आम्हाला या विधानसभेमध्ये यश मिळेल असा मला विश्‍वास असल्याचे निरीक्षक फिरोज लाला यांनी सांगितले. मागील काही महिन्यांपूर्वी एमआयएममध्ये अंतर्गत वाद सुरू झाला होता. मात्र तो वाद आता मिटला असल्याचे निरीक्षक यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details