हिंगोली:योगिता संतोष कऱ्हाळे (२८) अस मयत पत्नीचे नाव आहे. संतोष कराळे आणि पत्नी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. 6 मे रोजी संतोषची आई आपल्या दोन नातासह लग्न समारंभासाठी गेली होती. तर संतोषचे वडील हे शेतामध्ये झोपण्यासाठी गेले होते. संतोष आणि त्याची पत्नी हे दोघे घरी होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास पती-पत्नीमध्ये जोराचे भांडण झाले. यानंतर संतोषने पत्नीवर हल्ला चढविला आणि तिचा खून केला. संतोष हा रात्रभर तिच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. विशेष म्हणजे, त्यांनेच ही बाब आपल्या सासरकडच्या मंडळींना सांगितली.
सासरकडील मंडळीला आला संशय:योगिताचामृत्यू झाल्याची माहिती सासरच्या मंडळीला कळताच त्यांना खून झाल्याचा संशय आला. त्यांनी लागलीच हिंगोली येथील ग्रामीण पोलीस ठाण्याला संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली. यानंतर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, पोलीस उपनिरीक्षक मगन पवार, जमादार विकी कुंदानी, शेख महंमद, रामराव चिभडे, आकाश पंडितकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. खूनी पतीला ताबडतोब पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
अनैतिक संबंधाच्या संशयातून खून:नागपूर शहरातील विठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीने अनैतिक संबंधाच्या संशयावरून गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना 2021 मध्ये उघडकीस आली होती. एवढेच नाही हत्येनंतर आरोपी पतीने पत्नीच्या बेपत्ता झाल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात तो उघडा पडला. हंसा पटेल असे त्या मृत पत्नीचे नाव असून युवराज पटेल असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलीसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.