हिंगोली -नांदेड-कळमनुरी रस्त्यावर झालेल्या एका विचित्र अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या एका डॉक्टरासह निलगायीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - शेतकऱ्यांची गंभीर स्थिती सरकारच्या कानावर घालून मदतीसाठी प्रयत्न करणार - शरद पवार
डॉ. विजय कदम (राहणार हिंगणी ता. कळमनुरी) असे मृताचे नाव आहे. कदम हे आपल्या (एमएच 38, 7904 या क्रमांकाच्या दुचाकीने हिंगोलीकडून कळमनुरी मार्गे जात होते. खानापूर चित्ता या गावापासून काही अंतरावर रस्ता पार करत असलेल्या निलगायीची दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या डॉ. कदम यांना जोराची धकड बसली. यामध्ये त्यांच्या छातीत निलगायीचे डोके जोराने लागले अन् लांब फेकले गेले.
डोके रस्त्यावर आदळल्याने कदम यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. घटनास्थळी खूप गर्दी झाली. त्यांनी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला असता काही वेळात रुग्नवाहिका घटनास्थळी दाखल झाली. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेच निलगायचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
हेही वाचा -शाळकरी मुलावर तरूणाचा अनैसर्गिक अत्याचार; नराधम गजाआड