महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या;  लग्न होऊन झाले होते केवळ दीड महिने

ज्योती विशाल खंदारे या नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ज्योती विशाल खंदारे

By

Published : Jun 18, 2019, 5:49 PM IST

हिंगोली - अवघ्या दीड महिन्यात लग्न झालेल्या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. ज्योती विशाल खंदारे (वय २१) असे या मृत महिलेचे नाव आहे. मात्र, विवाहितेने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नवविवाहितेच्या आत्महत्येने गावात एकच खळबळ उडाली आहे


हिंगोली जिल्ह्यातील ईसापूर रमना येथील विशाल यांचा नांदेड जिल्ह्यातील लाहरी येथील तरुणीशी दीड महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. नुकतीच संसाराला सुरुवात झाली, घरात आनंदाचे वातावरण असताना अचानक या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बासंबा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. नांदेड जिल्ह्यातून मृत विवाहितेचे नातेवाईक घटनास्थळी येईपर्यंत मृतदेह लटकलेल्या अवस्थेतचं होता.


घटनास्थळी दाखल झालेले पोलीस कर्मचारी नातेवाईक येईपर्यंत प्रतीक्षेत बसले होते. लग्नाला अवघे चाळीस दिवस उलटले असताना या विवहितेने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकाराने परिसरात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details