महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीमध्ये 'वंचित'च्या मुलाखतीसाठी इच्छुकांची गर्दी, नावे ऐकून व्हाल थक्क - मतदान

अनेक पदसिद्ध पदाधिकारी वंचितकडे वळाले असल्याचे आजच्या वंचितच्या इच्छुक उमेदावरांच्या मुलाखतीवरून दिसून आले. वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

हिंगोलीमध्ये वंचितच्या मुलाखतीसाठी इच्छुकांची गर्दी, नावे ऐकून व्हाल थक्क

By

Published : Jul 25, 2019, 8:58 PM IST

हिंगोली- हिंगोलीमध्ये लोकसभा निवडणुकीत मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला भरभरून मतदान केले होते. या निवडणुकीत वंचितने पावणेदोन लाखांपर्यंत मजल मारली होती. हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीतही असेल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन अनेक पदसिद्ध पदाधिकारी वंचितकडे वळाले असल्याचे आजच्या वंचितच्या इच्छुक उमेदावरांच्या मुलाखतीवरून दिसून आले. वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

हिंगोलीमध्ये वंचितच्या मुलाखतीसाठी इच्छुकांची गर्दी, नावे ऐकून व्हाल थक्क

इच्छुक उमेदवारांची नावे -

हिंगोली विधानसभा

संभाजी दादाराव पाटील, गोविंदराव फुलाजीराव भवर, महेश केशव गांजरे, अॅड. महादेव संभाजी बेंडवाले, वशीम अहेमद फहिम देशमुख, आनंदराव किसनराव फाळके

कळमनुरी विधानसभा-

शिवाजी शामराव गावंडे, दिलीप रावसाहेब नाईक, शंकर लालजी आडे, प्रविणकुमार नामदेव राठोड, अॅड. रवी यशवंतराव शिंदे, खंडबाराव दिनकरराव नाईक, दिलीप तात्याराव मस्के, मतीन अलाउद्दीन कामले, मोहम्मद जिया. मोहम्मद उस्मान कुरेशी, अशोकराव नारायण दिंडे, धम्मज्योती माधव पंडित, प्रशांत माधवराव बोडखे, अजित उत्तमराव मगर, डॉ. बी.डी. वाघमारे

वसमत विधानसभा-

सुभाष बाबाराव नरवाडे, वसंत नारायणराव खंदारे, नंदा मारुती यगडे, प्रभावती सिद्धार्थ खंदारे, अॅड. शेख युक्ती खान म.जब्बार, मुकुंद नागोराव करवंदे, फैजल पटेल, आनंत रामराव भरोसे, स. अहिर स. महेबुब

अशी वंचितकडून विधानसभा निडवडणूक लढवू इच्छुकांची नावे आहेत. तर यातील काही नावे चकित करणारी आहेत. यामध्ये इतर पक्षातील लोकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

250 रुपयांच्या पावत्या 800 रुपयाला

वंचित आघाडीच्या सभासद नोंदणी अभियानाच्या 250 रुपयांच्या पावत्या 800 रुपयाला दिल्याचा प्रकार वसमत येथील एका इच्छुक उमेदवार मुकुंद करवंदे यांनी समोर आणला आहे. त्यांनी 250 रुपयांच्या पावत्या देणाऱ्यांना समजावून सांगितले. मात्र त्यांने काही ऐकून घेतले नाही. त्यावेळी करवंदे यांनी अण्णाराव पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी 'मुलाखत देणाऱ्या उमेदवारासाठी अर्ज निशुल्क उपलब्ध असल्याचे सांगितले, अशी माहिती करवंदे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details