हिंगोली- लोकसभा मतदार संघात ३४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. तर ८ उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले. बुधवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या निगराणीत निवडणूक निरीक्षक डॉ. जे. रविशंकर यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली.
हिंगोली मतदारसंघात ३४ उमेदवाराचे अर्ज वैध - जिल्हाधिकारी
हिंगोली लोकसभा मतदार संघात ३४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. तर ८ उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले.
पात्र उमेदवारांमध्ये डॉ. दत्ता मारोती धनवे, सुभाष बापुराव वानखेडे, अल्ताफ अहमद एकबाल, असदखान मोहम्मद खान, उत्तम भगाजी कांबळे, उत्तम मारोती धाबे, चक्रधर पांडुरंग देवसरकर, हेमंत श्रीराम पाटील, मकबूल अहेमद अब्दुल हबीब, मोहनसिंग फत्तेसिंग राठोड, वर्षा शिवाजी देवसरकर, सुभाष नागोराव वानखेडे, सुभाष परसराम वानखेडे, अ. कदीर मस्तान सय्यद, पिराजी गंगाराम इंगोले, त्रिशला मिलिंद कांबळे, गंगाधर रामराव सावते, गजानन हरिभाऊ भालेराव, जयवंता विश्वभंर वानोळे, शिवाजी मुंजाजीराव जाधव, विठ्ठल नागोराव ढोले, देवजी गंगाराम असोले, पठाण सत्तारखा कासीम खा, प्रकाश विठ्ठलराव घून्नर, मनीष दत्तात्रय वडजे, मारोतराव कानबाराव हूक्के, वसंत किसन पाईकराव, संतोष मारुती बोईनवाड, संदीप विजयराव निखाते, संदेश रामचंद्र चव्हाण, सुनील दशरथ इंगोले,सुभाष काशिबा वानखेडे, सुभाष मारुती वानखेडे, सुभाष विठ्ठल वानखेडे यांचा समावेश आहे.
या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र ठरले अवैध
चाऊस शेख जाकीर शेख महुम्मद, नारायण रामा पाटील, कोंडीबा गुनाजी मस्के, राजश्री हेमंत पाटील, गंगाधर दादाजी बलकी, आबासाहेब विठ्ठल कल्याणकर , बाबू धनु चव्हाण, नारायण तुकाराम इरबतनवाड या उमेदवारांचा समावेश आहे.
एकंदरीत सुभाष वानखेडे नावाचे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून निवडणूक लढविणारे सुभाष वानखेडे यांना काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. तर अपक्ष म्हणून भरलेल्या एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्याने त्या उमेदवारासह त्यांच्या समर्थकांनी काही काळ जिल्हाधिकारी परिसरात गोंधळ घातला होता. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.