महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत 223 कोरोनाबाधितांची नोंद, 282 कोरोनामुक्त - कोरोनाबाधितांची नोंद

जिल्ह्यात 323 नवीन कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी दिली आहे. 282 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 4 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधितांची नोंद
कोरोनाबाधितांची नोंद

By

Published : Apr 25, 2021, 1:32 AM IST

हिंगोली- जिल्ह्यात 323 नवीन कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी दिली आहे. 282 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 4 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

456 रुग्णांची प्रकृती चिंताजनक
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोनारुग्णांपैकी 410 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. तर 46 रुग्णांची प्रकृती अतीगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवले आहे. अशाप्रकारे 456 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आतापर्यंत 186 रुग्णांचा झाला मृत्यू
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण 11 हजार 568 रुग्ण आढळले असून त्यापैकी 9 हजार 900 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजघडीला जिल्ह्यात एकूण 1482 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 186 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे. तर एवढ्या दिवसात पहिल्यांदाच एका दिवशी एवढे मोठे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

हेही वाचा -राज्यात नव्या 67 हजार 160 रुग्णांची नोंद, 63 हजार 818 जणांची कोरोनावर मात

ABOUT THE AUTHOR

...view details