हिंगोली- एरव्ही गंभीर रुग्ण म्हंटलं की धावून जाणारी 108 रुग्णवाहिकाच पहिल्यांदा लक्षात येते. मात्र, दिवसेंदिवस कारभार ढेपाळत चालला आहे. रुग्णवाहिकेवरील बहुतांश डॉक्टरही दारुच्या नशेत राहत असल्याची खळबळजनक बाब बुधवारी रात्रीच्या सुमारास उघड झाली. 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टर चक्क रुग्णाला हलविण्याचे सोडून रेफर केलेल्या डॉक्टरसोबतच वाद घालत असल्याचे भयंकर दृश्य दिसून आले.
हिंगोली येथील जिल्हासामान्य रुग्णालयात मनिषा बालखंडे या युवतीला उपचारासाठी बुधवारी दुपारी 2.30 वाजता दाखल केले होते. उपचार करूनही तिचा काही केल्या रक्तस्राव थांबत नव्हता. त्यामुळे पुढील उपचारासाठी तिला नांदेड येथे रेफर करण्यात आले. युवतीच्या नातेवाईकांनी 108 या टोल फ्री क्रमांकावरून कॉल सेंटरला फोन केला. तीन तासानंतर आखाडा बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका रात्रीच्या सुमारास दाखल झाली. रुग्णवाहिकेवरील डॉक्टर अपघात कक्षात पोहोचले. मात्र, तेथील डॉ. नितीन पुरोहित हे गंभीर रुग्णाकडे लक्ष न देता थेट वाद घालत होते. हा वाद एवढा खालच्या दर्जाचा होता, की रुग्णवाहिकेवरील डॉक्टर अरेरावीची भाषा वापरत होता. शिवाय आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील करीत होते. जोराची आरडाओरड देखील करीत होते.
डॉक्टरांमधील हा वाद पाहण्यासाठी रुग्णालयात एकच गर्दी झाली होती. डॉ. सूरज देशमुख असे त्या रुग्णवाहिकेच्या डॉक्टरचे होते. तर दुसरीकडे मात्र ती युवती अतिरक्तस्राव होत असल्याने विवळत होती. डॉक्टर मात्र कुणाचेही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते
रेफर लेटरचाही तुटवडा -