हिंगोली- जगभरात कोरोना विषाणूने थैमाने घातले आहे. भारतात देखील कोरोनाग्रस्तांची संख्या ६०० च्या वर पोहोचली आहे. त्यातच आता विदेशातून हिंगोलीत आलेल्या दहा जणांना होम क्वारंनटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
विदेशातून हिंगोलीत आलेले 10 जण होम क्वॉरंनटाईन, प्रशासनाचे बारकाईने लक्ष
विदेशातून आलेल्या दहा जणांना हिंगोलीमध्ये होम क्वारंनटाईन करण्यात आले आहे. यामध्ये होम क्वारंनटाईन केलेल्यांमध्ये फिलिपाईन्स येथून 3, ऑस्ट्रोलिया 2, कझाकिस्तान 1, सौदी अरेबिया 1, जर्मनी 1, मालदीव 2 यांचा समावेश आहे. या सर्व नागरिकांचे त्यांच्याच घरात विलगीकरण करण्यात आले आहे.
होम क्वारंनटाईन केलेल्यांमध्ये फिलिपाईन्स येथून 3, ऑस्ट्रोलिया 2, कझाकिस्तान 1, सौदी अरेबिया 1, जर्मनी 1, मालदीव 2 यांचा समावेश आहे. या सर्व नागरिकांचे त्यांच्याच घरात विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर होम क्वॉरंनटाईचा शिक्का देखील मारलेला आहे. त्यांना सलग 14 दिवस घरातच थांबण्याच्या सूचना प्रशासनाच्यावतीने लेखी देण्यात आल्या आहेत.
रॅपीड अॅक्शन टीम मार्फत त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असून त्यांची नियमितपणे विचारपूस देखील केली जात आहे. यांच्या पैकी कोणाला कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना तत्काळ आयसोलेशन वार्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक तथा सनियंत्रक डॉ. किशोर श्रीवास यांनी सांगितले. तसेच हिंगोली जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बनविण्यात आलेल्या आयसोलेशेन वार्डमध्ये एकही संशयित नसल्याची माहितीही त्यांनी दिली.