हिंगोली - चारचाकीमधून नेली जाणारी १ कोटींची रोख रक्कम निवडणूक पथकाने हिंगोलीतील हिवरा पाटी येथे जप्त केली आहे. ही रक्कम नांदेडहून हिंगोलीकडे चारचाकीने ( एम.एच.३८, ८०८२) नेली जात होती. ही रक्कम बँकेची असल्याचे सांगण्यात आले. मात्र, रक्कम नेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते, ती घेतली गेली नाही. तसेच, वाहनात कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत.
हिंगोलीत १ कोटी रुपयांची रक्कम जप्त, परवानगीविनाच नेली जात होती रक्कम
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर निवडणूक विभागाने हिंगोली जिल्ह्यात १० ठिकाणी चेक पोस्ट उभारले आहेत. येथे वाहनांची अतिशय बारकाईने तपासणी केली जात आहे. अशाच एका तपासणीत ही चारचाकी सापडली. या चारचाकी कोणतीही कागदपत्रे न आढळल्याने संशय उत्पन्न झाला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर निवडणूक विभागाने हिंगोली जिल्ह्यात १० ठिकाणी चेक पोस्ट उभारले आहेत. येथे वाहनांची अतिशय बारकाईने तपासणी केली जात आहे. अशाच एका तपासणीत ही चारचाकी सापडली. या चारचाकी कोणतीही कागदपत्रे न आढळल्याने संशय उत्पन्न झाला. त्यामुळे रक्कम जप्त करण्यात आली. ही रक्कम सीलबंद करुन कळमनुरी येथील उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात आली.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील बैठक पथक क्रमांक ३ मधील सतीश माळोदे, बागुल, रामराम राठोड, वाबळे यांनी केली. आतापर्यंत कळमनुरी विधानसभा मतदारसंघात तीन पथकाकडून पाच कारवाया झाल्या असून, यात दीड कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.