महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विदर्भकन्या झाली महाराष्ट्राची पहिली महिला धुरकरी; पुरुषप्रधान शंकरपटात सीमाची भरारी

४५ वर्षांच्या सीमा पाटील या मूळच्या बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्‍यातील ज्ञानगंगापूर या गावच्या आहेत. सीमा लहानपणापासून वडिलांना शेतीकामात हातभार लावायच्या.

सीमा पाटील

By

Published : Mar 8, 2019, 3:59 PM IST

बुलडाणा- मर्दानी, मैदानी खेळ अशी शंकरपटाची ओळख आहे. भल्याभल्यांची या खेळात भाग घेताना भंबेरी उडते. मात्र, या पुरुषप्रधान खेळाला आव्हान दिले आहे सिमा पाटील या मर्दानी महिलेने. सतत बसणारे पुरुषी अहंकाराचे टोमणे ऐकत लढत देऊन विदर्भाची कन्या शंकरपटात भाग घेऊन बैल हाकणारी एक मर्दानी महिला धुरकरी बनली आहे.


४५ वर्षांच्या सीमा पाटील या मूळच्या बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्‍यातील ज्ञानगंगापूर या गावच्या आहेत.सीमा लहानपणापासून वडिलांना शेतीकामात हातभार लावायच्या. मुक्‍या जनावरांचा त्यांना विशेष लळा, त्यात साथ मिळाली ती जीवन आणि पवन या बैलजोडीची. त्यांनी जवळपास शेकडो शंकरपट गाजवलेत असे सीमाताई सांगतात, तर तब्बल २१ वेळा प्रथम पुरस्कार फक्त आणि फक्त जीवन आणि पवन यांच्यामुळेच शक्य झाल्याचेही त्या म्हणतात.

सीमा पाटील

वयाच्या २० व्या वर्षी सीमा पाटील यांनी पवन आणि जीवन या जुळ्या बैलांच्या आधाराने शंकरपटात भाग घेतला. बघता बघता आज ३० वर्षे लोटली आणि सीमा पाटील ह्या शंकरपटातील केवळ मानकरी न ठरता शंकरपटाच्या पुरुषप्रधान अहंकाराला तडा देणारी पहिली महिला म्हणून प्रकाशझोतात आल्या. ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या त्या सदस्य आहेत. महिला कोणत्याच क्षेत्रात कमी नसताना शंकरपटातली जागाही भरून काढली हे सीमाताई आनंदाने सांगतात. मात्र इतके असतानाही शासनाने साधी दखल घेतली नसल्याची खंत आजही त्यांना सलते. कोणतीही शासकीय योजना मिळाली नसून बैलांसाठी त्यांनी ४ वेळा अर्ज केला तरीही गोठा मिळाला नसल्याचे त्या सांगतात. तर त्यांची शासनदरबारी नोंद व्हावी, असेही त्यांना वाटते.

ABOUT THE AUTHOR

...view details