गोंदिया- आगामी विधानसभा निवडणूक युवा स्वाभिमान पक्ष फक्त विदर्भच नव्हे तर संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाची ध्येय धोरणे आतापासूनच जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या कामाला गोंदियापासून सुरुवात करण्यात आली आहे. लोकांच्या वाढत्या प्रतिसादाने आम्ही भारावले असून काम करण्याची आमची इच्छा दुपटीने वाढली असल्याचे मत खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केले आहे. गोंदियातील शासकीय विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
'युवा स्वाभिमान पक्ष' स्वबळावर लढणार विधानसभा - नवनीत राणा - खासदार नवनीत राणा
युवा स्वाभिमान पक्षाने स्वतंत्र विदर्भ राज्याला याआधीच समर्थन दिले असून नागपुरात अडकलेली विकासाची गंगा सोडवण्यासाठी विदर्भातील जनतेला जागृत होण्याची आणि काम करण्याची गरज असल्याचे राणा म्हणाल्या.
पश्चिम महाराष्ट्र व मुंबईच्या तुलनेत विदर्भातील सर्व जिल्हे मागासलेले असून या संपूर्ण विदर्भाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याची स्थापना होणे गरजेचे आहे, युवा स्वाभिमान पक्षाने स्वतंत्र विदर्भ राज्याला याआधीच समर्थन दिले असून नागपुरात अडकलेली विकासाची गंगा सोडवण्यासाठी विदर्भातील जनतेला जागृत होण्याची व काम करण्याची गरज असल्याचे राणा म्हणाल्या.
राज्यातील सरकारने सरसकट कर्जमुक्ती करणे आवश्यक आहे. तसेच स्वतंत्र विदर्भाचा आवाज बुलंद करण्यासाठी लोकसभेतही आवाज बुलंद करणार याची कबुली देत त्या म्हणाले की, मागील पाच वर्षात गोंदिया जिल्ह्याच्या विकासाला ब्रेक बसला असून केंद्र शासनाने मंजूर केलेले 140 लाख रुपये या जिल्ह्यातल्या जन प्रतिनिधींना विकासासाठी आणता आले नाही, ही बाब गंभीर आहे. तसेच विदर्भ वेगळा झाला तर या विदर्भ राज्याचे सर्वात मोठे फायदे शेतकऱ्यांना होणार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.