गोंदिया : घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर सक्षमपणे पेलतात म्हणून महिलांना आदराने होम मिनिस्टरही म्हटले जाते. गोंदियातील याच होम मिनिस्टर्सनी अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. 'एक दिन साइकिल के नाम' या उपक्रमात सहभागी होत पर्यावरण आणि आरोग्य रक्षणाचा संदेशही त्यांनी दिला.
एक दिन सायकल के नाम
घरातील महिलेचे आरोग्य चांगले असले तर कुटुंबाचेही आरोग्य चांगले राहते असे म्हटले जाते. मात्र कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे महिलांना लठ्ठपणा, शारीरिक कमजोरी अशा समस्यांना सामोरे जावे लागते. छोट्या त्रासाकडे वेळीच लक्ष न दिल्याने अनेकदा गंभीर आजारपणाचाही त्यांना सामना करावा लागतो. हेच लक्षात घेत गोंदियातील महिलांनी एकत्र येत स्वतःच्या आरोग्याविषयी महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी 'एक दिन साइकिल के नाम' या उपक्रमाचे आयोजन केले.