महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात आज बुद्ध पौर्णिमेला वन्यप्राण्यांची प्रगणना

आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त पाणस्थळावर वन्यप्राण्यांची प्रगणना होणार आहे. ही प्रगणना रात्री मचाणावर बसून केली जाणार आहे.

By

Published : May 18, 2019, 7:45 AM IST

Updated : May 18, 2019, 3:24 PM IST

पाणस्थळावर पाणी पिताना माकड

गोंदीया- राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यामध्ये आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त पाणस्थळावर वन्यप्राण्यांची प्रगणना होणार आहे. त्यासाठी वन्यप्रेमींची मदत घेतली जाणार आहे. या प्रगणनेला गेल्या वर्षीपासून 'निसर्ग अनुभव', असे संबोधण्यात येते देशभरातील निसर्गप्रेमी यात सहभागी होतात.

प्रगणने माहिती सांगताना
वन्यजीव सरंक्षित क्षेत्र व राखीव क्षेत्रात वन्यप्राण्यांचा संख्येचा अंदाज आणि नागरिकांना जंगलातील रात्रीचा निसर्ग अनुभवता यावा. यासाठी बुद्ध पौर्णिमेला पाणवठ्यावरील प्रगणना करण्यात येत असते. ती यंदा आज रात्री मचाणावर बसून केली जाणार आहे. त्यासाठी सुरक्षित क्षेत्रामध्ये विद्यमान परिस्थितीच्या आधारे संभावित पाणस्थळांची संख्या निश्चित करणे, स्वयंसेवकांची नोंदणी करणे, पाणस्थळावर स्थायी मचाण उभारणे, स्थायी मचाणावर महिला स्वयंसेवकांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. प्रत्येक मचाणावर एक स्वयंसेवी खासगी व्यक्ती व एक विभागाचा प्रतिनिधी, असे दोघेच असणार आहेत. १८ वर्षाखालील व्यक्तीला प्रगणनेत सहभागी होता येणार नाही.
Last Updated : May 18, 2019, 3:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details