गोंदिया - विदर्भ साहित्य संघाच्या वतीने दरवर्षी 'दिवाळी पहाट'चा कार्यक्रम घेण्यात येत असतो. दरवर्षी या कार्यक्रमाच्या उदेशाने आजची नवपिढी जी आपली संस्कृती विसरत चालली आहे. त्या संस्कृतीचा ठेवा पुन्हा जीवित व्हावा यानिमित्ताने दिवाळी पहाटचा कार्यक्रम घेतला जातो.
विदर्भ साहित्य संघाच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रम लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक ठेव्याची जपणुक करण्याच्या उद्देशाने विदर्भ साहित्य संघ या कार्यक्रमाचे आयोजन करत राहणार, अशी भूमिका असल्याचे विदर्भ साहित्य संघ शाखा गोंदियाच्या वतीने सांगण्यात आले. गोंदिया येथील गायकांना भविष्यात वाव मिळायला हवा त्यासाठी विदर्भ साहित्य संघाच्या वतीने या 'दिवाळी पहाट'च्या कार्यक्रमानिमित्ताने प्रयत्न केला जातो.
हेही वाचा - सट्टा व्यावसायिकाकडून १० हजारांची लाच घेणारा पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
दरवर्षी या कार्यक्रमाचे विविधस्वरुपाने आयोजन करण्यात येते. यावर्षीही नागपूरच्या म्युझिकल ग्रुपला बोलावण्यात आले होते. त्यांनी यावेळस प्रेक्षकांना एकापेक्षा एक सरस अशी मराठी व हिंदी गाणी सादर केली ज्याचा रसिक श्रोत्यांनी मनमुराद आनंद लुटला. गालावर खळी, ये देश है वीर जवानों का, ऊठी ऊठी गोपाळा, हे सुरांनो चंद्र व्हा, अशी अनेक गाणी गात आपल्या सुश्राव्य आवाजात गाणी सादर करीत या ग्रुपने सर्वांचे मन मोह करून टाकले होते.
हेही वाचा - गोंदिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल विजयी