गोंदियात दोन मजुरांची इमारतीत झोपलेल्या अवस्थेत निर्घृण हत्या
गोंदिया शहरातील सिंधी कॉलोनी येथील एका नवनिर्माण इमारतीमध्ये दोन मजुरांची झोपेतच निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोन्ही मजुर हे उतर प्रदेशमधील आहेत. गुरुवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीत चार मजूर झोपले होते. या पैकी दोघांची झोपेतच निर्घुण हत्या करण्यात आली. या पैकी एक मजूर घटनास्थळावरून पसार झाला आहे.
गोंदिया: शहरातील सिंधी कॉलोनी येथील एका नवनिर्माण इमारतीमध्ये दोन मजुरांची झोपेतच निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोन्ही मजुर हे उतर प्रदेशमधील आहेत. गुरुवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीत चार मजूर झोपले होते. या पैकी दोघांची झोपेतच निर्घृण हत्या करण्यात आली. या पैकी एक मजूर घटनास्थळावरून पसार झाला आहे. तर एक मजूर घटनास्थळी असून त्याने याची माहिती परिसरातील लोकांना दिली. परिसरातील लोकांनी याची माहिती गोंदिया शहर पोलिसांनी दिली असून पोलिसांनी घटनस्थळी येऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी पाहणी केली असून पुढील तपास गोंदिया शहर पोलीस करीत आहे.