गोंदिया -येथील गोंदिया-गोरेगाव मार्गावर हिरडामालीजवळ बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दोन जणांचा मृत्यू झाला. संदिप परसराम शेंदरे (22), दिलीप राधेलाल न्यायमूर्ती (26) अशी मृतांची नावे आहेत. तर शिवम महेश्वर उईके (22) गंभीर जखमी झाला आहे.
एसटी बस आणि दुचाकी भीषण अपघात; दोन जागीच मृत्यू, एक गंभीर - बस दुचाकी अपघात गोंदिया
एसटी आणि बसच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला. त्याला गोंदियातील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बस क्रमांक (एमएच.40 एक्यू 6194) यवतमाळ-नागपूर-गोंदिया ही बस गोरेगाव मार्गाने गोंदियाला जात होती. यावेळी गोंदियावरुन कोहडीपारला मृत दिलीप न्यायमुर्ती व संदीप शेंद्रे व जखमी शिवम उईके हे तिघे मोटरसायकलने जात होते. यावेळी हिरडा मालीजवळ पोल्ट्री फ्रॉमजवळ एसटी बसने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी येऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह गोरेगाव येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले. तर जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश नारनवरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.