महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टेम्पोच्या धडकेत दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनी तालुक्यातील आदिवासी विकास हायस्कूल खजरी येथील दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला असून एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

gondiya accident
gondiya accident

By

Published : Feb 10, 2021, 6:51 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील सडकअर्जुनी तालुक्यातील आदिवासी विकास हायस्कूल खजरी येथील दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला असून एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. जखमी विद्यार्थ्यांवर गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सडक अर्जुनी तालुक्यांतर्गत येत असलेल्या मुर्दोली ते कोहमाराकडे जाणार्‍या मार्गावर खजरीजवळ विरुद्ध दिशेने येणार्‍या मेटाडोरच्या (एमएच 20/सीटी 6018) चालकाने दुचाकीवर ट्रिपल सीट येणार्‍या विद्यार्थ्यांना जबर धडक दिली. यात 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर 1 गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात आज 10 फेब्रुवारी रोजी घडला. मृतांमध्ये तुषार बृजलाल शिवणकर (रा. मुर्दोली) व शुभम नंदकुमार भीमटे (रा. मुंडरीटोला) यांचा समावेश आहे. हे खजरी येथील आदिवासी विकास हायस्कूलमध्ये वर्ग 11 वी मध्ये शिक्षण घेत होते. तर प्रवीण सतीश कटरे (रा. डव्वा) हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर गोंदियाच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अकरावीत शिकणारे हे तीन विद्यार्थी दुचाकीने शाळेत जात होते. त्यावेळी शाळेपासून १०० मीटर अंतरावर कोहमाराकडून गोंदियाकडे जाणाऱ्या मेटाडोर वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मेटाडोर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास डुगीपार पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details