गोंदिया -रेल्वेने गांजाची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 60 हजार रुपये किमतीचा 6 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. मो. जमशेद वल्द अब्दुल हमीद (वय-45) आणि मो. अली वल्द अब्दुल सत्तार ((वय-46, रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
रेल्वेने गांजाची तस्करी, 2 आरोपींना अटक - रेल्वे
रेल्वे पोलिसांची अवैध तस्करीला आळा घालण्यासाठी शोध मोहीम सुरू असताना गोंडवाना एक्सप्रेसमध्ये दोन आरोपी संशयितरीत्या फिरताना आढळले. विचारपूस केली असता उडवा-उडवीची उत्तरे देत असताना पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपी
रेल्वे पोलिसांची अवैध तस्करीला आळा घालण्यासाठी शोध मोहीम सुरू असताना गोंडवाना एक्सप्रेसमध्ये दोन आरोपी संशयितरीत्या फिरताना आढळले. विचारपूस केली असता उडवा-उडवीची उत्तरे देत असताना पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ 6 कोलो गांजा आढळून आला. या गांजाची बाजार भावाप्रमाणे किंमत 60 हजार रुपये आहे. दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर NDPS ACT नुसार कारवाई करण्यात आली आहे.
Last Updated : Aug 1, 2019, 9:56 PM IST