गोंदिया- मुंबई ते हावडा रेल्वे मार्गावरील गोंदिया हा महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. त्यामुळे येथे चोऱ्यांचेही प्रमाण वाढले असून त्यातच 2 सराईत मोबाईल चोरट्यांना गोंदिया रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकावर अटक केली आहे.
दोन मोबाईल चोरटे गोंदिया रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात - ईतवारी
रेल्वे स्थानकातील गर्दीत प्रवाशांच्या मोबाईलवर हात साफ करणाऱ्या दोन चोरट्यांना गोंदिया रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अमन राहुल मेश्राम (वय 29 वर्षे) आणि सलीम सफी शेख (वय 29 वर्षे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रेल्वे पोलीस गस्तीवर आसताना रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 4 वर शिवनाथ एक्स्पेस आली. यावेळी गाडीतून प्रवास करणारे प्रवासी संजीत डहारे ईतवारीकडून दुग्रकडे जात होते. या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांचा मोबाईल चोरी केला. या प्रकरणी त्यांनी रेल्वे पोलिसांत तक्रार दिली. रेल्वे पोलिसांनी त्वरित शोधमोहिम राबविली असता, फलाट क्रमांक 1 वर दोघे जण झोपून असलेल्या प्रवाशांच्या सामानांची चाचपणी करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी मोबाईल चोरी केल्याचे कबूली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेले मोबाईलही हस्तगत करण्यात आले असून पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशीही गोंदियात मुसळधार पाऊस, २४ तासात गारपीटीचे संकेत