महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात अदानी पॉवरच्या गेटसमोर ट्रकची दुचाकीला धडक, दोन तरुण जागीच ठार

अपघाताची माहितीमिळताच ट्रक चालकाने ट्रक घेऊन घटनास्थळी न थांबता पळ काडला. घटनेनंतर तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अदानीतील सुरक्षा रक्षकांच्या सहाय्याने  सर्वप्रथम दोन्ही मृतदेह रस्त्याच्या बाजुला करून वाहतुकीकरता मार्ग मोकळा केला.

तिरोडा अदानी पॉवरच्या गेटसमोर ट्रकची दुचाकीला धडक, दोन तरुण जागीच ठार

By

Published : May 4, 2019, 10:13 PM IST

गोंदिया - तिरोडा-गोंदिया महामार्गावर तिरोड्यातील अदानी विद्युत निर्मिती प्रकल्पातील राख घेवून निघालेल्या भरधाव ट्रकने (एम.एच. ३५/ ए.डी. ६७७४) गोंदियावरून घोगराकडे जाणाऱ्या दुचाकीला अदानी पॉवरच्या गेट क्रं २ समोर धडक दिली. या अपघतात दुचाकीवरील दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. रोहित चौरे व निशिकांत गजभिये (रा. घोगरा ता. तिरोडा) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

अपघाताची माहितीमिळताच ट्रक चालकाने ट्रक घेऊन घटनास्थळी न थांबता पळ काडला. घटनेनंतर तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अदानीतील सुरक्षा रक्षकांच्या सहाय्याने सर्वप्रथम दोन्ही मृतदेह रस्त्याच्या बाजुला करून वाहतुकीकरता मार्ग मोकळा केला. ट्रक चालकाला तिरोडा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपस सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details