गोंदिया - जिल्ह्यतील तिरोडा तालुक्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या व वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास नागझिरा अभयारण्यालगत असलेल्या मंगेझरी येथील गावालगतच्या जंगलात मोहफुल वेचायला गेलेल्या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना समोर आली आहे.
मोहफुल वेचायला गेलेल्या महिलेची वाघाने केली शिकार - GONDIA NEWS
मंगेझरी येथील अनिता संजय तुमसरे असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिला मोहफुल वेचायला कुटुंबियांसोबत गेली असताना वाघाने हल्ला करत अर्धा किलोमीटरपर्यंत ओढत नेले.
tiger
मंगेझरी येथील अनिता संजय तुमसरे असे मृत महिलेचे नाव आहे. तुमसरे या मोहफुल वेचायला कुटुंबीयांसोबत गेल्या असताना वाघाने हल्ला करत अर्धा किलोमीटरपर्यंत ओढत नेले. याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. तसेच वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे.