महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ट्रॅक्टर नाल्यात पडून तिघांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबाला १ लाखाची आर्थिक मदत

दोन दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. रोवणीच्या कामांनी वेग पकडला आहे. एकाचवेळी रोवणे सुरू झाल्याने मजूर मिळत नाहीत. त्यामुळे बाहेरगावाहून मजूर आणावे लागत आहे. सावंगी येथून ट्रॅक्टरने मजूर नेत असताना नाल्यात ट्रॅक्टर उलटून तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना घडली.

ट्रॅक्टर नाल्यात पडून तीघांचा मृत्यू

By

Published : Jul 28, 2019, 5:07 PM IST

Updated : Jul 28, 2019, 8:08 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील सडक- अर्जुनी तालुक्यात डव्वा येथे मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने ट्रॅक्टर पुलाखाली पडला. या घटनेत चार मजुरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले आहे. घटनास्थळी आमदार राजकुमार बडोले यांनी भेट देऊन मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी १ लाख आणि जखमींना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री मदत निधीतून देण्यात येईल अशी माहिती दिले.

ट्रॅक्टर नाल्यात पडून तीघांचा मृत्यू

दोन दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. रोवणीच्या कामांनी वेग पकडला आहे. एकाचवेळी रोवणे सुरू झाल्याने मजूर मिळत नाहीत. त्यामुळे बाहेरगावाहून मजूर आणावे लागत आहे. सावंगी येथून ट्रॅक्टरने मजूर नेत असताना नाल्यात ट्रॅक्टर उलटून तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना घडली. भागवत लक्ष्मण गजबे (४४ रा. डुग्गीपार), ईश्वरदास मंगरू संग्रामे (२५ रा. डुग्गीपार) आणि शोभाबाई अश्वीन बनसोड (४० रा.डुग्गीपार) अशी मृतांची नावे असून या घटनेत १२ जण जखमी झाले आहेत.

भूसारीटोला येथील धनलाल बोरू राऊत यांच्या शेतात रोवणीचे काम सुरू आहे. रोवणीकरता महिला आणि पुरूष मजूर कोहमारा नजीक असलेल्या सावंगी येथून डुग्गीपार येथील भागवत गजबे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर (क्रमांक एमएच ३५,जी ८१६२) ने कोहमाराकडून डव्वाकडे जात होते. दरम्यान खजरी आणि डव्वा यांच्या मधे असलेल्या नाल्याच्या पुलावर ट्रॅक्टर आला. समोरून ट्रक येत असताना ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरची गती कमी केली. मात्र, मागून येणाऱ्या कंटेनर (एमएच ३१, एफसी २३०९) ने ट्रॅक्टरला धडक दिली. चालकाचे ट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पुलावरून नाल्यात पडला.

या घटनेत निर्मला प्रल्हाद मस्के (रा. सावंगी), महानंदा भागवत ठाकरे (२५ रा. सावंगी) भगवान सोमा वाढई (५० रा. सावंगी), यकुबाई आत्माराम काळसर्पे (४० रा. सावंगी). पुस्तकला रुपचंद काळसर्पे (वय ६१, रा. सावंगी), शालू नंदेश्वर काळसर्पे (३२, रा. सावंगी), रुपचंद काळसर्पे (६२, रा. सावंगी), मिराबाई राजेश मेश्राम (४० रा. सावंगी), कोकीळा राजेश बनसोड (५५, रा. सावंगी), सविता प्रकाश लांजेवार (४० रा. सावंगी), चुडामन रामजी भिवगडे (५५, रा. सावंगी). अशोक हरीदास वाढई (४५, रा. सावंगी) हे जखमींची झाले आहेत. जखमींवर ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे उपचार करून पुढील जखमींना पुढील उपचाराकरता केटीएस रुग्णालय गोंदिया दाखल करण्यात आले.

Last Updated : Jul 28, 2019, 8:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details