गोंदिया -चोरट्याला अवघ्या 24 तासांमध्ये अटक करण्यात आमगाव पोलिसांना यश आले आहे. आमगाव शहराच्या अनियानगर येथील भैयालाल शिवबंशी यांच्या घरी २३ डिसेंबरच्या संध्याकाळी ७ वाजे दरम्यान चोरी झाली होती. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने 1 लाख 25 हजार रुपये किंमतीचे दागिने आणि 32 हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला होता.
चोरट्याला अवघ्या 24 तासांमध्ये अटक करण्यात यश, आमगाव पोलिसांची कारवाई - गोंदिया क्राईम न्यूज
चोरट्याला अवघ्या 24 तासांमध्ये अटक करण्यात आमगाव पोलिसांना यश आले आहे. आमगाव शहराच्या अनियानगर येथील भैयालाल शिवबंशी यांच्या घरी २३ डिसेंबरच्या संध्याकाळी ७ वाजे दरम्यान चोरी झाली होती. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने 1 लाख 25 हजार रुपये किंमतीचे दागिने आणि 32 हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला होता.
चोरट्याला अवघ्या 24 तासांमध्ये अटक
या प्रकरणी भैयालाल शिवबंशी यांनी आमगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अनमोल आरसे असं या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. त्याला न्यायालयाने 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.