गोंदिया- विधानसभा निवडणुका लागताच भाजपला मोठा हातोडा बसणार आहे. भाजपचे अनेक आमदार तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, नेते असे अनेक लोक काँग्रेसच्या संपर्कात असून लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट माजी खासदार तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे.
भाजपचे अनेक नेते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील; नाना पटोले यांचा गौप्यस्फोट - प्रचार प्रमुख
नाना पटोले यांनी आज गोंदिया जिल्ह्यातून प्रचाराची सुरुवात केली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे अनेक नेते लवकरच काँग्रसे पक्षात प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
नाना पटोले यांचा गौप्यस्फोट
नाना पटोले यांची काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली. दरम्यान, आज गोंदिया जिल्ह्यातून त्यांनी प्रचाराची सुरुवात केली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्याच्या घडीला काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्ते, आमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असल्याचे दिसत आहे. मात्र, यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांना प्रश्न केला असता त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.