महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाशिवरात्री निमित्त पंचमुखी पुरातन शिवकालीन मंदिरात भाविकांची गर्दी - temple

महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीपर्यंत भाविक दर्शन घेणार असल्याने मंदिर आज मध्यरात्रीपर्यंत खुले राहणार आहे. या मंदिराची वास्तू दगडात बांधलेले आहे.

गोंदिया

By

Published : Mar 4, 2019, 11:49 AM IST

गोंदिया - पूर्व महाराष्ट्राच्या अंतिम टोकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नागरा येथील पंचमुखी मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी काल मध्यरात्रीपासून मोठी गर्दी केली आहे. शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरिता महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगडसह विविध भागातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

गोंदिया


मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीपर्यंत भाविक दर्शन घेणार असल्याने मंदिर आज मध्यरात्रीपर्यंत खुले राहणार आहे. या मंदिराची वास्तू दगडात बांधलेले आहे. अत्ंयत मनमोहक असे या मंदिराचे बांधकाम आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गीताप्रेस गोरखपूर येथे प्रकाशित होणाऱ्या कल्याण मासिक १९५१ पत्रिकेमध्ये या मंदिराचा उल्लेख केला आहे. यावरून हे मंदिर किती प्राचीन आहे हे लक्षात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details