गोंदिया - गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव (Arjuni Morgoan) तालुक्यातील अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत रामघाट क्रमांक 1 बीट कक्ष क्रमांक 254 बी मध्ये वाघाचा मृतदेह आढळला (Tiger Killed). मृत वाघाचे नखं आणि दात गायब असल्याने या वाघाची शिकार झाल्याचे प्राथमिकदृष्टया आढळून आले आहे. त्यामुळे वन विभागाबरोबरच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Tiger killed in Gondia : गोंदियाच्या रामघाट बीटात आढळला वाघाचा मृतदेह; नखं आणि दात गायब
गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव (Arjuni Morgoan) तालुक्यात वाघाचा मृतदेह (Tiger Killed) आढळला. मृत वाघाचे नखं आणि दात गायब असल्याने या वाघाची शिकार झाल्याची माहिती मिळत आहे. वनविभागाकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
मृत वाघाचे नखं आणि दात गायब -
आज सकाळी वनाधिकाऱ्यांद्वारे जंगलात पेट्रोलिंग सुरु असताना संबंधित घटना उघड़ झाली आहे. अर्जुनी मोरगावपासून दहा किलोमीटर अंतरावर निलज गावालगत दोन किलोमीटर अंतरावर सदर घटना घडली. मृत वाघाचे नखं आणि दात गायब आहेत. त्यांमुळे त्याची शिकार केल्याची प्राथमिक माहिती असून आरोपींनी शिकार कशा प्रकारे केली यादृष्टीने तपास सुरु आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील अशीच शिकारीची घटना घडली होती. ही घटना उघड झाल्यानंतर अनेक आरोपींना अटक झाली होती. मात्र आजच्या घटनेनंतर वनविभागासमोर एक आव्हान उभे ठाकले असून, वन विभागाद्वारे आरोपींचा शोध सुरु आहे.