महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 14, 2022, 5:53 PM IST

ETV Bharat / state

Brutal Beating to Tribal Student : शिक्षकाकडून आदिवासी विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण ; संतप्त पालकाचा तीव्र रोष

शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होईपर्यंत काठी आणि पाईपने बेदम मारल्याची धक्कादायक घटना ( teacher brutal beating to Tribal student ) घडली. सदर शिक्षकासह शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांचेकडे निवेदनातून केली आहे, तसेच पोलिसात देखील तक्रार केली ( teacher beating to student ) आहे.

GONDIA PRESECTIVE INTERNATIONAL SCHOOL
गोंदिया प्रेगेसिव्ह इंटरनँशनल शाळा

गोंदिया -शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होईपर्यंत काठी आणि पाईपने बेदम मारल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळेत घडली ( teacher brutal beating to Tribal student) आहे. या घटनेमुळे संतप्त पालकांनी आपला रोष शाळा व्यवस्थापनावर व्यक्त केला. सदर शिक्षकासह शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांचेकडे निवेदनातून केली आहे, तसेच पोलिसात देखील तक्रार केली आहे.

शिक्षकाची आदिवासी विद्यार्थ्याला काठी आणि प्लास्टिकच्या पाईपने बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाणआरटीईच्या नियमातंर्गत देवरी तालुक्यातील मुरपर या गावातली विद विद्यार्थी हा प्रेगेसिव्ह इंटरनँशनल शाळेत शिकतो. शाळेचा सकाळच्या शारीरिक सराव सूरू असताना या शाळेतील शिक्षकाने शुल्लक कारणावरून सौरभ या आदिवासी विद्यर्थाला आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होईपर्यंत काठी आणि पाईपने बेदम मारहाण केली. याची माहिती त्याच्या वडिलांना होताच, त्यांनी शाळेत धाव घेतली. विद्यार्थीला गावी घेऊन आले. विचारपूस केली असता विद्यार्थीने आपल्याला मारहाण केली असल्याचे घरच्यांना सांगितले. याची तक्रार त्यांनी देवरी येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना केली. मात्र काही दिवस झाले तरी काही कार्यवाही न झाल्याने त्यांनी सरळ धाव पोलीस ठाण्यात घेतली. त्या शाळेतील शिक्षक व शाळा व्यवस्थापनाविरुद्ध पोलीस तक्रार केली ( beating to Tribal student in Gondia ) आहे.

संबंधित शिक्षकांवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणीया मारहाणी प्रकरणामुळे शिक्षकांच्या भीतीपोटी हा विद्यार्थी खूप घाबरला. त्यामुळे तो आता शाळेत जाणार नसल्याचे देखील बोलत ( teacher brutal beating to tribal student in Gondia ) आहे. आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले. त्या चौकशी समितीमध्ये सौरभ याला शिक्षकाकडून मारहाण केल्याचे समोर आल्याने शिक्षक दोषी असल्याने आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी शाळा प्रशासनाला पत्र दिले, कि संबंधित शिक्षकांवर तात्काळ कार्यवाही करावी. शाळा प्रशासनाने दोन्ही शिक्षकांना निलंबित केले असल्याचे शाळा प्रशासनाने फोनवरून कळवले, मात्र अद्याप लेखी पत्र माळलेला नाही. अशी माहिती आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details