गोंदिया - जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील 25 वर्षीय युवकाने स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली. घरचे लग्न करून देत नसल्याने आत्महत्या केल्याची माहिती कुटूंबियांनी दिली आहे.
हेही वाचा -अँटीजेन टेस्ट केल्यानंतरच मुंबई शहरात, थिएटर, मॉल व सरकारी कार्यालयात प्रवेश
आमगाव तालुकाअंतर्गत येत असलेल्या फुक्कीमेटा येथील 25 वर्षीय युवकाने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत युवक हा दारू पिण्याच्या आधीन गेला होता. तो नेहमी दारू पिऊन घरी येऊन घरच्यांशी भांडण करायचा आणि आपल्या आई-वडिलांना माझे लग्न का करून देत नाही? या गोष्टीवर नेहमी भांडत करायचा. दोन-तीन दिवसाआधी त्याने या गोष्टीवरून आपल्या आई-वडिलांसोबत खूप भांडण करत मारपीट केली. या कारणाने मृताचे आई वडील घरी राहत नव्हते. काल रात्री मृत युवकाने आपल्या स्वतःच्या घराच्या खोलीमधील खांबाला दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मृताचे काका यांनी आमगाव पोलिसांना दिली. आमगाव पोलीस घटनास्थळावर पोहचून पंचनामा करून मृत्यूदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठविण्यात आला. मृताच्या काकाने याची तक्रार आमगाव पोलिसांना दिली आहे. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार दिलीप उरकुडे करत आहेत.
हेही वाचा -मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे