गोंदिया-रक्ताचे नाते सर्वात श्रेष्ठ असते, असे म्हटले जाते. मात्र, त्या नात्याला काळिमा फासणारी घटना गोंदिया तालुक्यात घडली. असोली नजीक असलेल्या पाटील टोला येथे शनिवारी (८ ऑगस्ट) घटना घडली. ६ वर्षाच्या मुलीवर तिच्या घरी कोणीही नसल्याचे बघून सख्ख्या काकाने अत्याचार केला. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आरोपी काका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अत्याचार करणारा आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
गोंदियात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना; सख्ख्या काकाचा ६ वर्षीय पुतणीवर अत्याचार - गोंदिया क्राईम न्यूज
६ वर्षाच्या मुलीवर तिच्या घरी कोणीही नसल्याचे बघून सख्ख्या काकाने अत्याचार केला. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आरोपी काका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अत्याचार करणारा आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
गोंदिया तालुक्यातील असोली पाटीलटोला हे छोटेसे गाव आहे. या गावातील ६ वर्षाची मुलगी, भाऊ आणि बहिणी सोबत घराजवळ खेळत होती. तिचे आई वडील शेतात कामाला गेले होते. या संधीचा फायदा घेत त्या मुलीचा काका संजय प्रेमलाल राऊत २० वर्ष याने त्या मुलीला त्याच्या जवळ बोलावले. तिला तो घरी घेऊन गेला. घरी घेऊन गेल्यानंतर घराचे दार बंद करून त्याने अत्याचार केला.
आई-वडील घरी आल्यानंतर मुलीने त्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. घटनेनंतर आरोपी संजय प्रसार झाला आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.