महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

UPSC Exam Result : शिक्षणाने माणूस ताकदवर बनतो, शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा - माणूस ताकदवर बनतो

चौथ्या प्रयत्नात अखेर आयएएस परिक्षेत निवड झालेल्या शुभला शिक्षण क्षेत्रात काम करायचे आहे. यामुले तो प्रशासकीय सेवेत कार्यरत होण्याचे स्वप्न पूर्ण केल्याचे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. सध्या शुभम भैसारे हा इंडिया रेल्वे सर्व्हिस लखनऊला कार्यरत आहे. दुसऱ्या प्रयत्नात आयईएस झालो. पण, आयएएस होण्याचे स्वप पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि कठोर परिश्रम घेतले त्यातूनच यश संपादन केल्याचेही शुभम सांगतो.

शुभम भैसारे
शुभम भैसारे

By

Published : May 30, 2022, 9:06 PM IST

नागपूर- चौथ्या प्रयत्नात अखेर आयएएस परिक्षेत निवड झालेल्या शुभमला शिक्षण क्षेत्रात काम करायचे आहे. यामुळे तो प्रशासकीय सेवेत कार्यरत होण्याचे स्वप्न पूर्ण केल्याचे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. सध्या शुभम भैसारे हा इंडिया रेल्वे सर्व्हिस लखनऊला कार्यरत आहे. दुसऱ्या प्रयत्नात आयईएस झालो. पण, आयएएस होण्याचे स्वप पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि कठोर परिश्रम घेतले त्यातूनच यश संपादन केल्याचेही शुभम सांगतो.

शुभम हा मूळचा गोंदिया जिल्ह्यातील साकोली येथील असून त्याचे वडील हे ग्राहकमंचात चेयरमन पदावर सेवेत होते. त्यामुळे वेळोवेळी बदली होत त्यांचा कुटुंबाचा प्रवास एका शहरातून दुसऱ्या शहरात होत राहिला. स्वतःसाठी प्लॅन बी म्हणून सुरुवातीला इंजिनिअरिंग केले. याचाच आधार घेऊन यूपीएससी परीक्षेत सिव्हिल इंजिनिअरिंग हा विषय घेऊन अभ्यास केल्याचे शुभम सांगतो.

असा राहिला 97 वी रँक मिळवण्याचा प्रयत्न -2017 मध्ये इंजिनिअरिंग पास झाल्यानंतर यूपीएससी परीक्षा दिली. मुलाखत झाली पण एका मार्कने पहिली संधी हुकली. पण, हताश न होता पुन्हा स्वतःच्या चुका शोधून अभ्यास सुरू केला. दुसऱ्या टप्प्यात यूपीएसीत 749 रँकसह यश मिळाले. पण मनासारखी रँक मिळाली नव्हती. त्यानंतर तिसऱ्यांदा प्रयत्न केला. पण, तीच सर्व्हिस मिळाली. त्यामुळे अखेर चौथ्यांदा परिक्षा देण्याचे ठरवले. पण, तोपर्यंत पाठीशी मोठा अनुभव होता चुका लक्षात घेऊन स्वतःला आणखी जितके चांगले करता येईल तेवढे प्रयत्न केले. चुका दुरुस्त करून पूर्ण ताकदीने प्रयत्न केले आणि मोठे यशही पदरी पाडून घेतले. 97 वी रँक मिळाल्याने आता मनासारखी रँक मिळाल्याचे समाधान असल्याचे शुभम भैसारे यांनी सांगितले. त्यामुळे इंजिनीयरिंगच्या डिग्रीचा फायदा झाला. कधी कधी मनात भीती असायची पण स्वतःचे 100 टक्के प्रयत्न दिले. यातच गुरूमंत्र सांगताना स्वतःला कधी समाधानी होऊ देऊ नका जितके जास्त चांगले काम करता येईल त्यासाठीच स्वतःमध्ये सतत बदल आणि प्रयत्न सुरू ठेवा.

शिक्षणाने माणूस ताकदवर बनतो -आयएएस बनल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खासकरून ग्रामीण भागामध्ये काम करण्याची इच्छा आहे. कारण शिक्षण हे माणसाला ताकदवर बनवते. त्यामुळे त्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न चालूच आहेत. कुठलाही कारणांनी शिक्षण मिळाले नाही ते आर्थिक असो की अन्य कोणते. यासाठी प्रयत्न करायचे आहे. फक्त शिक्षणच नाही तर खेळ, संस्कृती व इतरही क्षेत्रात मुलांना स्वतःची प्रगती साधता यावी. यासाठी त्यांना त्यासोयी सुविधा पुरवण्याचा ध्येय मनात ठेवून प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून काम करणार असल्याचेही शुभम भैसारे सांगतो.

हेही वाचा -Kalyani Jagtap Upsc : गोंदियाच्या कल्याणी जगतापचे युपीएससी परीक्षेत यश; म्हणाली, डॉ. कलाम माझे प्रेरणास्त्रोत

ABOUT THE AUTHOR

...view details