गोंदिया -जिल्ह्यात १५ जानेवारीला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे सर्वात अधिक उमेदवार व सरपंच निवडून येणार, असे मत नगरविकास व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. ते आज गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील विजयालक्ष्मी येथे शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी झाले, त्यावेळी बोलत होते.
शिवसैनिकांत उत्साह
गोंदिया जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसैनिकांत मोठा उत्साह आणि नवसंजीवनी निर्माण करण्यासाठी ते येथे आले होते. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून जास्तीत जास्त सरपंच हे शिवसेनेचे असणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नाराजी दूर करणार
नागपूर शिवसेनेचे जुने समर्थक नाराज असून सर्व नाराज शिवसैनिकांची नाराजी लवकरात लवकर दूर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.