गोंदिया - मद्यधुंद पोलिसांची एका सात वर्षीय बालकाला बेदम माराहाण केल्याची घटना गोंदियातील फुलचूरटोला येथील माऊली कॉलनीमध्ये घडली. या घटनेमुळे खळबळ माजली असून चक्क पोलिसाने कायदा हातात घेत निरागस बालकाला मारहाण केल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सदर मुलाचे वडील तक्रार दाखल करायला गेल्या नंतर त्यांची तक्रार पोलीस घ्यायला तयार नव्हते. शेवटी वडीलाच्या अट्टाहासापूढे पोलिसांनी नमते घेत त्या मारहाण करणाऱ्या पोलिसा विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
गोंदियात मद्यधुंद पोलिसाची सात वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण - सत्यजीत बारसे पोलीस न्यूज
पीडित कुटुंबाने गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन येथे यासंदर्भात तक्रार दाखल करण्यास गेल. परंतु तेथील पोलीस तक्रार दाखल करुन घेत नव्हते. मात्र, मुलाचे वडील प्रदिप बन्सोड यांनी तक्रार दाखल करावीच लागेल असा अट्टाहास पोलिसांकडे धरला.
या घटनेची मिळालेली माहिती अशी की, माऊली कॉलोनीतील वैभव प्रदिप बन्सोड हा घराजवळ खेळत होता. त्यावेळी त्याच्या घरा शेजारील पोलीस कर्मचारी सत्यजीत बारसे याने त्या खेळत असलेल्या सात वर्षाच्या मुलाला शुल्लक कारणावरून मारहाण केली. नातवाला मारहाण होत असत्याचे पाहून त्या मुलाची आजी मध्यस्थी करण्यासाठी गेली असता,त्याने तिलाही मारहाण केली. त्यानंतर पीडित कुटुंबाने गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन येथे यासंदर्भात तक्रार दाखल करण्यास गेल. परंतु तेथील पोलीस तक्रार दाखल करुन घेत नव्हते. मात्र, मुलाचे वडील प्रदिप बन्सोड यांनी तक्रार दाखल करावीच लागेल असा अट्टाहास पोलिसांकडे धरला. त्यानंतर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम ३२३ अन्वये अदखलपात्र गुन्हा पोलीस कर्मचारी सत्यजीत बारसेवर दाखल केला. मात्र, आता त्या मद्यपी पोलिसाला निलंबित करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुलाच्या वडिलांनी केली आहे.