महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियाच्या वैभवने तयार केली इलेक्ट्रिक सॅनिटायझर मशीन - sanitizer machine

गोंदियात एका तरुणाने लॉकडाऊनच्या काळाचा सदुपयोग करीत कमी खर्च व कमी साहित्यात कुठेही नेता येऊ शकणारी सॅनिटायजर मशीन तयार केली आहे. त्यामुळे ही मशीन कोरोनाच्या संकटात नागरिकांना फायदेशीर ठरणार आहे.

गोंदियाच्या वैभवने तयार केली इलेक्ट्रिक सॅनिटायझर मशीन

By

Published : May 4, 2020, 7:47 PM IST

गोंदिया -जगभरासह देशातही कोरोना मोठ्या प्रमाणात पसरत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयांसह, खासगी दुकाने, कंपन्या सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर गोंदियात एका तरुणाने लॉकडाऊनच्या काळाचा सदुपयोग करीत कमी खर्च व कमी साहित्यात कुठेही नेता येऊ शकणारी सॅनिटायजर मशीन तयार केली आहे. त्यामुळे ही मशीन कोरोनाच्या संकटात नागरिकांना फायदेशीर ठरणार आहे.

गोंदियाच्या वैभवने तयार केली इलेक्ट्रिक सॅनिटायझर मशीन

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच जग थांबले आहे. लॉकडाऊन असल्यामुळे नागरिक घरीच असल्यामुळे टीव्ही पाहून, मोबाईलमध्ये गेम खेळून किंवा फावल्या वेळात प्रयोग करीत असतात. याच लॉकडाऊनचा फायदा घेत गोंदियातील वैभव सिंगी या तरुणाने कमी खर्चात आणि कमी साहित्याचा उपयोग करीत कोरोना व्हायरसच्या बचावापासून उपयोगी सॅनिटायझर मशीन तयार केली.

विशेष म्हणजे ह्या मशीनचा आकार लहान असल्याने कुठेही घेऊन जाता येते, तर मशीनचा उपयोग शासकीय कार्यालये, दुकाने व घरीही करता येणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटावेळीही सॅनिटायझर मशीन नक्कीच नागरिकांसाठी मदतगार ठरू शकते. गोंदिया जिल्हा हा आता ग्रीन झोनमध्ये असल्यामुळे शिथिलता देण्यात आली असून आज सोमवारपासून दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे दुकानांमध्ये लावण्यासाठी ही मशीन फायद्याची ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details