महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोदिंया जिल्ह्यात २०१९ मध्ये अपघाताचे प्रमाण १० टक्क्यांनी घटले

रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन तसेच वाहतूक नियमांबाबत प्रबोधनात्मक शिबिरे, रस्ता सुक्षतेच्या आधारावर जिल्ह्यात २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अपघाताचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी झाले असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

२०१९ मध्ये गोंदिया जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण १० टक्क्यांनी घटले
२०१९ मध्ये गोंदिया जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण १० टक्क्यांनी घटले

By

Published : Jan 24, 2020, 5:21 PM IST

गोंदिया - जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नुकताच शहरात वाहतूक पोलीस विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. रस्ता सुक्षतेच्या आधारावर गोंदिया जिल्ह्यात वर्ष २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अपघाताचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी झाले आहे. वर्ष २०१८ मध्ये २९० अपघात झाले असून त्यात १७४ लोकांनी आपला जीव गमावला तर, १९७ लोक जखमी झाले आहेत. तर, २०१९ मध्ये २६२ अपघात झाले असून, १५८ लोकांचा मृत्यू तर, १५८ लोक जखमी झाले आहेत.

२०१९ मध्ये गोंदिया जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण १० टक्क्यांनी घटले

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी प्रबोधनात्मक शिबिरे होत असतानाही वाहतूक नियम सर्रास पायदळी तुडवले जातात. सुरक्षा सप्ताह सुरू असताना ऐरवी लोकांना याची शिस्त लागेल अशी अपेक्षा असते. तर, अनेक लोकांना याची शिस्त लागलेली असुन जिल्ह्यात २०१९ मध्ये अपघाताचा आकडा १० टक्क्यांनी कमी झाला असल्याचे समोर आले आहे.

वाहतुकीच्या नियमांकरिता गोंदिया शहरात वाहने पार्किंगसाठी रस्त्याच्या बाजूला सम-विषम पार्किंगचे बोर्ड लावण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकात 'पे अ‍ॅण्ड पार्क'ची योजना करण्यात आली असताना वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वर्षभरात केलेल्या कारवाईमधून ८३ लाख २२ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत ही रक्कम अधिक आहे.

हेही वाचा - धक्कादायक..! शासकीय राजमुद्रेचे बनावटी नियुक्तीपत्र देऊन ७८ बेरोजगारांना लाखों रुपयाने फसविले

अवैध प्रवासी वाहतूक, परवाना न हाताळणे, नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करणे, इंग्रजी-मराठी फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा वापरणे, विना हेल्मेट दुचाकी चालवणे आदी नियम मोडणांऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून जनजागृतीही करण्यात येत असते.

हेही वाचा - गोंदियात श्वानांचे लसीकरण शिबीर, जिल्ह्यातला पहिला प्रयोग

ABOUT THE AUTHOR

...view details